१० जून १८९१ मध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी संपादन केली. मित्रांनो, बॅरिस्टर झाल्यावर गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांनी आपली वकिली सुरू केली. पण त्यांना या क्षेत्रात पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. इतर कामापेक्षा त्यांना राजकारणात अधिक रस होता. या कार्याची सुरुवात त्यांनी दक्षिण अफ्रिकेतच केली. कित्येक चळवळीत भाग घेतला, पण मित्रांनो, हे कार्य करीत असताना त्यांना बराच अपमान सहन करावा लागला. प्रसंगी मारहाण सुद्धा झाली. भारतात तर त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यांच्या एका शब्दावर असंख्य भारतवासी चळवळीत सहभागी व्हायचे. गांधीजी अहिंसेचे पुजारी होते. देशसेवेचे कार्य अहिंसेच्या मार्गाने व्हावे असे त्यांना वाटायचे. त्यांनी खिलाफत चळवळ मागे घेतली. कारण या चळवळीने हिंसक वळण घेतले होते. जनहिताकडे गांधीजींचे अधिक लक्ष असायचे. इंग्रजांनी मीठावर जेव्हा कर लावला तेव्हा महात्माजींनी दांडी यात्रा काढून मोठाचा सत्याग्रह केला. एवढेच नव्हे तर अस्पृश्यांना हरिजन म्हणून संबोधिले. मित्रांनो, १९४१ चा वैयक्तिक सत्याग्रह तसेच १९४२ च्या 'चले जाव' चळवळीच्या वेळी तर संपूर्ण देश जागा झाला होता. त्यांना देशकार्यासाठी वृत्तपत्राचा देखील आधार घेतला. गांधीजी 'सत्याग्रही' नावाचे साप्ताहिक संपादित करीत असत.मात्र ८ ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांना अटक आल्यावर त्यांचे संपादनाचे कार्य बंद पडले. गांधींचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याला तोड नाही. देश स्वतंत्र
झाल्यावर त्यांनी कसल्याही पदाची अभिलाषा बाळगली नाही. अशा या महापुरुषावर एका माथेफिरूने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. तो दिवस म्हणजे ३० जानेवारी१९४८. सबंध देशाला प्रकाश दाखवणारा हा महान नेता चिर निद्राधीन झाला.
Post a Comment